रत्नागिरी / नगर सह्यद्री- चॉकलेट म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाच्याच आवडीची गोष्ट आहे. लहान मुलांमध्ये चॉकलेटची विशेष क्रेझ असते. ...
रत्नागिरी / नगर सह्यद्री-
चॉकलेट म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाच्याच आवडीची गोष्ट आहे. लहान मुलांमध्ये चॉकलेटची विशेष क्रेझ असते. मात्र हे चॉकलेच एका बालकाच्या मृत्यूचे कारण ठरले आहे. जेली चॉकलेट घशात अडकल्याने 9 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात घडली आहे. गुहागर तालुक्यातील साखरीआगर गावातील ही दुदैवी घटना घटना आहे. याप्रकरणी गुहागर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे तेरेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रिहांश तेरेकर (वय ९ वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचं नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, रिहांशला त्याच्या घरच्यांनी जेलीचे चॉकलेट खाण्यासाठी दिले होते. नकळत ते खाताना त्याच्या घशात अडकले. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
दरम्यान, कुटुंबीयांनी त्याला तातडीने उपचारासाठी गावातील एका डॉक्टरांकडे नेले. तेथे डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि दुसऱ्या डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला. दरम्यान, डॉक्टरच्या सल्ल्यावरुन त्याला घोणसरे येथे नेत असताना रस्त्यातच रिहांशचा बाळाचा मृत्यू झाला.
रिहांशच्या अचानक अशा निघून जाण्याने त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. या दुर्देवी घटनेमुळे साखरी आगर गावात शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद गुहागर पोलिसांत करण्यात आली आहे.
लहान मुलांना चॉकलेट खूप आवडतात. त्यामुळे आई-वडील नातेवाईक त्यांना चॉकलेट घेऊन देतात. मात्र, पालकांनी आपल्या पाल्यांना कोणत्या चॉकलेट देत आहोत, तसेच ते चॉकलेट खाण्यायोग्य ते बाळ आहे की नाही, तसेच लहान वयाच्या पाल्यांकडे लक्ष ठेवले पाहिजे, असे या आवाहन या घटनेनंतर केले जात आहे.
COMMENTS