पुणे / नगर सहयाद्री- पुणेकरांसाठी एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील ग्रामीण भागातील CNG Pump चालकांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्य...
पुणे / नगर सहयाद्री-
पुणेकरांसाठी एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील ग्रामीण भागातील CNG Pump चालकांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे पुण्यातील ग्रामीण भागातील CNG Pump आज पासून अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहेत.
आज पासून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील CNG Pump चालकांनी बेमुदत संप पुकारला आहे. याचा परिणाम सामान्य वाहतुकीवर होणार आहे. टोरंट कंपनीने नफ्याचा हिस्सा न दिल्याने पुणे ग्रामीणमधील सर्व CNG Pump चालकांनी बेमुदत संप पुकारला आहे. पुणे शहरातील MNGL ची सेवा मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.
एकीकडे पुणे जिल्ह्यात MNGL कंपनीने आणि प्रमुख CGDने थकबाकीसह पैसे दिलेत किंवा ते देण्यास सहमती दर्शवली आहे. तर दुसरीकडे टोरंट गॅससह काही कंपन्यांनी पैसे देण्याबाबत वाद केल्यामुळे हा संप पुकारल्याचे CNG Pump चालकांकाडून सांगण्यात आले आहे.
२०२१ मध्ये परिपत्रक जारी केल्यानंतरही CNG डीलर्संनी फेअर ट्रेड मार्जिन जारी करण्याबाबत टोरंट कंपनीसोबत अनेक वेळा चर्चा केली. मात्र, कंपनीने कुठलेही पाऊल उचलले नाही. ज्यामुळे पुणे जिल्ह्यातील CNG वितरकांचे आजपर्यंत जवळपास ८ कोटींचे नुकसान झाले आहे. यासाठीच हे आंदोलन करण्यात येत असल्याचे पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपरेल यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, OMCसह संबंधित सर्व प्राधिकरणांसह अनेक वेळा यासंदर्भात बैठका झाल्या आहेत. असं असतानाही, परिपत्रकानुसार डीलर्संना त्यांच्या मागणीला योग्य न्याय मिळू शकलेला नाही. आता जोपर्यंत यासंदर्भात निर्णय घेत नाहीत. तोपर्यंत हा संप सुरु राहणार असल्याचं CNG Pump चालकांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पुणे ग्रामीण भागातील एकूण ४२ CNG Pump बेमुदत काळासाठी बंद राहणार आहेत. याचा फटका वाहतुकीवर पडणार असल्याने पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
COMMENTS