सातारा / नगर सहयाद्री- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरे (ता महाबळेश्वर) गावच्या यात्रेसाठी साताऱ्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. ...
सातारा / नगर सहयाद्री-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरे (ता महाबळेश्वर) गावच्या यात्रेसाठी साताऱ्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते प्रथमच यात्रेसाठी आल्याने गावात मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. ढोल ताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे गावकऱ्यांनी स्वागत केले. आज सकाळी परिसराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ग्रामसभा ही झाली.
दरे तांब उचाट आदी पंधरा गावांची मिळून उत्तरेश्वर यात्रा भरते. यासाठी मुख्यमंत्र्यांचे दोन दिवसांच्या मुक्कामी गावी शुक्रवारी सायंकाळी आगमन झाले. मुख्यमंत्र्यांनी रात्री परिसरात सुरु असणाऱ्या विकास कामांची माहिती घेतली. आज सकाळी ग्रामसभा त्यांच्या उपस्थितीत झाली. गावच्या यात्रेशिवाय मुख्यमंत्र्यांचा दुसरा कोणताही कार्यक्रम नाही. यामुळे परिसरातील ग्रामस्थांच्या ,साताऱ्यातील राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी आणि शेती शिवार भेट असा कार्यक्रम आहे.
मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी आल्यानंतर आपल्या शेतीची पाहणी केली. तेथे त्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग व सेंद्रिय शेती केली आहे. त्यांची पाहणी केली. एकनाथ शिंदे यांनी शेतात सध्या स्ट्रॉबेरी, सुपारी, लवंग, वेलची, दालचिनी, कॉफी, पेरू, आंबा, फणस, चिक्कू, सफरचंद, मिरची, हळद अशी पिके घेतली आहेत. तर मागच्या वेळी त्यांनी स्वत: शेतीची मशागत केली होती.
शिंदेंनी आपल्या शेतात लावलेल्या स्ट्रॉबेरी पिकाची पाहणी केली. तसेच शेतात छोट्या चार्जिंग गाडीतून गावात चक्कर मारली. मुख्यमंत्री गावात शुक्रवारी सायंकाळी सरकारी हेलिकॉप्टरने दाखल झाले. आपल्या निवासस्थानी जाण्याअगोदर त्यांनी थेट आपले शेत गाठले आणि त्या ठिकाणी शेतीची व पिकाची पाहणी केली. स्ट्रॉबेरी पिकामध्ये जाऊन त्यांनी स्वतःच्या हाताने स्ट्रॉबेरी तोडून खाल्ली. तसेच आपल्या बागेतील सुपारी झाडांचीही पाहणी केली.
रोज होत असलेले राजकारण आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीतून काहीसा ब्रेक घेत मुख्यमंत्री शिंदे हे आज त्यांच्या मूळ गावी जात शेतात रमले आहेत. रोजच्या धावपळीला ब्रेक देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा शेतात गावात रमले आहेत
COMMENTS