मुंबई / नगर सहयाद्री- राजकारणात गेल्या काही वर्षांपासून नवनवीन समीकरणे उदयास येत असतानाच, आता आणखी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आ...
मुंबई / नगर सहयाद्री-
राजकारणात गेल्या काही वर्षांपासून नवनवीन समीकरणे उदयास येत असतानाच, आता आणखी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात काल, बुधवारी अडीच तास गुप्त बैठक झाल्याचं कळतं.
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीपल्स रिपब्लिकन पक्षासोबत युती करून एक पाऊल पुढे टाकलं आहे. तर दुसरीकडे, प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेले असतानाच, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात काल अडीच तास बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र, आता आंबेडकर-शिंदे भेटीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा नव्याने चर्चा झाली आहे.
काल रात्री पुन्हा बंद दाराआड प्रकाश आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांची नेमकी भूमिका काय? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
COMMENTS