मुंबई । नगर सह्याद्री - चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जागतिक आरोग्य संघटना याने जनतेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे चीनने मान्य क...
मुंबई । नगर सह्याद्री -
चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जागतिक आरोग्य संघटना याने जनतेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे चीनने मान्य केले आहे. 'देशातील ८० टक्के जनेला कोरोना संसर्ग झाल्याचे सरकारी चीनी शास्त्रज्ञाने मान्य केले आहे.
'चीनी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोक फिरण्यास निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग आणखी पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही क्षेत्रात प्रचंड कोरोना पसरण्याची शक्यता आहे. चीनी लूनर नवीन वर्षात नागरिकांना सुटी असते. त्यामुळे चीनी नागरिक त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यास जातात'.
काही दिवसांपूर्वी चीनने त्यांची शून्य कोरोना धोरण रद्द करण्याच मोठा निर्णय घेतला. चीनने हे देखील मान्य केले आहे की, 12 जानेवारीपर्यंतच्या एका महिन्याच्या कालावधीत ६० हजार चीनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
नुकताच एक अहवाल समोर आला आहे की, चीनमध्ये कोरोनामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक नागरिक यामुळे रुग्णालयात देखील दाखल झाले होते. चीन खरे आकडे लपवत असेल तर जागतिक आरोग्य संघटनेसाठी मोठे आव्हान झाले आहे.
कोरोना सारख्या संकटाशी सध्या चीन सामना करत आहे. त्यामुळे चीनच्या आर्थिक विकास दराचे आकडे समोर आले होते. चीनचा आर्थिक विकास दर ३ टक्के राहिला आहे. कोरोनाच्या महामारीमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी असल्यामुळे आर्थिक विकास दरावर परिणाम झाला आहे.
COMMENTS