येस बँकेच्या टियर-१ बाँडमध्ये बँक आणि आरबीआय यांना मोठा झटका बसला आहे. या दोघांनाही राईट ऑफ करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला.
मुंबई / नगर सह्याद्री -
येस बँकेच्या टियर-१ बाँडमध्ये बँक आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) यांना मोठा झटका बसला आहे. या दोघांनाही राईट ऑफ करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. त्यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने येस बँकेला ६ आठवड्यांच्या आत या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.
येस बँकेने २०१६-१९ दरम्यान सुमारे ८,४१५ कोटी रुपयांचे टियर-१ (एटी) बाँड जारी केले होते. त्याला सुपर एफडी असे नाव देण्यात आले. त्यावर ९ ते ९.५० टक्के वार्षिक व्याज मिळत होते. त्यात निप्पॉन, फ्रँकलिन टेम्पलटन, यूटीआय, बडोदा मालमत्ता आणि संस्थात्मक गुंतवणूकदार यांसारख्या म्युच्युअल फंडांच्या ३२ योजना होत्या १,३०० अन्य गुंतवणूकदार होते.
२०२० मध्ये येस बँक अडचणीत आली तेव्हा हा बाँड रद्द करण्यात आला. यानंतर गुंतवणूकदारांनी आरबीआयकडे तक्रार केली. तथापि, येस बँकेने यापूर्वी सांगितले होते की त्यांच्या अटी व शर्तींमध्ये असे नमूद केले आहे की कोणत्याही अपयशाच्या बाबतीत गुंतवणूक राइट ऑफ केली जाईल.
COMMENTS