रशियाची राजधानी मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या चार्टर्ड फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर हे विमान उझबेकिस्तानकडे वळवण्यात आले.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
रशियाची राजधानी मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या चार्टर्ड फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर हे विमान उझबेकिस्तानकडे वळवण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात २४० प्रवासी होते. हे विमान पहाटे ४.१५ वाजता दक्षिण गोव्यातील दाबोलीम विमानतळावर उतरणार होते.
वृत्तानुसार, अझूर एअरद्वारे संचालित फ्लाइट एझेडव्ही २४६३ भारतीय हवाई हद्दीत पोहोचण्यापूर्वी उतरवण्यात आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दाबोलिम विमानतळ संचालकांना रात्री १२.३० वाजता ईमेलद्वारे या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली.
विशेष म्हणजे दोन आठवड्यात बॉम्बची धमकी मिळण्याची ही दुसरी घटना आहे. ९ जानेवारी रोजी मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या २४४ प्रवासी आणि कर्मचारी असलेल्या चार्टर विमानात बॉम्ब ठेवल्याचीही माहिती समोर आली होती. यानंतर गुजरातमधील जामनगरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. मात्र, त्यानंतर बॉम्बची माहिती खोटी असाचल्याचे निष्पन्न झाले.
COMMENTS