मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलला मंगळवारी धमकीचा फोन आला ज्यामध्ये अज्ञात कॉलरने शाळा उडवून देण्याची धमकी दिली.
मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलला मंगळवारी धमकीचा फोन आला ज्यामध्ये अज्ञात कॉलरने शाळा उडवून देण्याची धमकी दिली. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ४.३० वाजता शाळेच्या लँडलाइनवर फोन आला. फोन करणाऱ्याने शाळेत टाईम बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता.
धमकीचे फोन आल्यानंतर शाळेने स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. शाळेच्या तक्रारीच्या आधारे, बीकेसी पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात कॉलरविरुद्ध आयपीसीच्या कलम ५०५ (१) (बी) आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी फोन करणार्याचा शोध घेतला असून लवकरच आरोपीला अटक करणार असल्याचे सांगितले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलला धमकीचा कॉल आला होता ज्या दरम्यान अज्ञात कॉलरने हॉस्पिटल उडवून देण्याची आणि अंबानी कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली होती.
COMMENTS