अहमदनगर / नगर सहयाद्री- ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. नगर तालुक्यातील वाळकी येथील श्रीराम मंदिर शेजारी चहुबाजूंनी लोकवस्ती आहे.श्रीराम म...
अहमदनगर / नगर सहयाद्री-
ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. नगर तालुक्यातील वाळकी येथील श्रीराम मंदिर शेजारी चहुबाजूंनी लोकवस्ती आहे.श्रीराम मंदिरातून चोरट्यांनी चांदीच्या दोन पादुका आणि मंदिरातील दानपेटी लांबविली आहे. येथे भाविकांची मोठी वर्दळ देखील असते. त्यामुळे चाेरीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
मंदिरातील श्रीराम आणि अन्य देवतांची पूजाअर्चा करण्यासाठी सकाळी सात वाजता सचिन बाबासाहेब भालसिंग गेले. त्यावेळी त्यांना मंदिराचा दरवाजा उघडला. त्यावेळी त्यांना प्रकार लक्षात आला.
भालसिंग यांनी मंदिरातील गाभाऱ्यात जाऊन पाहिले असता, साधारण दोन किलो वजनाच्या चांदीच्या दोन पादुका आणि दानपेटी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनतर त्यांनी पोलिसांना चोरी संदर्भात माहिती दिली. वाळकी येथील श्रीराम मंदिर शेजारी चहुबाजूंनी लोकवस्ती आहे. येथे भाविकांची मोठी वर्दळ देखील असते. त्यामुळे चाेरीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
COMMENTS