मुंबई । नगर सह्याद्री - राधाकृष्ण विखे पाटील यांनी वक्तव्य केले आहे. नाशिक विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत बंडखोर उमेदवार सत्य...
मुंबई । नगर सह्याद्री -
राधाकृष्ण विखे पाटील यांनी वक्तव्य केले आहे. नाशिक विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपचा अधिकृत पाठिंबा जाहीर झाला नसला तरी कार्यकर्ते मात्र, सत्यजित तांबेंच्या समर्थनार्थ सोशल माध्यमातून सकारात्मक संदेश देत आहे. त्यामुळे आगामी काळात लवकरच सत्यजित तांबेंना अधिकृत पाठिंबा मिळेल असे संकेत भाजप नेत्यांकडून दिले जात आहे. विशेष म्हणजे भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीही सत्यजित तांबे घेत आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघ केंद्रस्थानी आलेला आहे. या जागेसाठी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांची चिंता वाढली होती. त्यात तांबे यांना भाजपा पक्ष पाठिंबा देणार असे म्हटले जात होते. मात्र, आता याबाबत संकेत मिळू लागले आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले,'' मी जी माहीती घेतोय त्यात कार्यकर्त्यांची जी भूमिका आहे. त्यानुसार, लोकांमध्ये सत्यजित तांबेंना मतदान करण्याबाबत चर्चा सुरू आहे आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंना मतदान करण्याचा निर्णय घेतला असून तो स्थानिक पातळीवरील निर्णय आहे. सत्यजित तांबेंना मतदान करावे असा आमच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आहे.
COMMENTS