मुंबई : रितेश देशमुखने ’वेड’ या मराठी चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या चित्रपटात रितेश देशमुखही मुख्य भूमिकेत आहे. यासोब...
मुंबई : रितेश देशमुखने ’वेड’ या मराठी चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या चित्रपटात रितेश देशमुखही मुख्य भूमिकेत आहे. यासोबतच त्याची रिअल लाइफ पत्नी जेनेलिया डिसूझा त्याच्या सोबत दिसत आहे. या चित्रपटाला बॉस ऑफिसवर ओपनिंगसह जबरदस्त प्रतिसाद मिळाला. चित्रपटगृहांच्या बाहेर मोठी गर्दी दिसून आली. या चित्रपटाने आपल्या ओपनिंग वीकेंड कलेशनने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. ’वेड’ चित्रपटातील रिअल लाइफ कपल जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख यांची ऑनस्क्रीन जोडी चाहत्यांना आवडते. या चित्रपटाला समीक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याचवेळी वेडचं ओपनिंग वीकेंड कलेशन समोर आलं आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी या चित्रपटाचं बॉस ऑफिस कलेशन सोशल मीडियावर शेअर केलं आहे. तरण आदर्शच्या ट्विटनुसार, वेडने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात १० कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशा प्रकारे, मराठी चित्रपट असल्याने त्याचे बॉस ऑफिस कलेशन जबरदस्त आहे. वेडने पहिल्या दिवशी २.२५ कोटींची कमाई केली. त्यानंतर शनिवारी ३.२५ कोटींचा व्यवसाय केला. आणि रविवारी या चित्रपटाने ४.५० कोटींचा गल्ला जमवला. अशा प्रकारे या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत १० कोटींची कमाई केली आहे. ’वेड’मध्ये रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांच्याशिवाय जिया शंकर, अशोक सराफ आणि शुभंकर तावडे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात सलमान खानचाही एक कॅमिओ आहे. रितेश आणि जेनेलिया तब्बल १० वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर ’वेड’वर रोमान्स करून मने जिंकत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुखनं केलं आहे. या चित्रपटातून जेनेलियानं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. या पूर्वी जेनेलियानं हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
COMMENTS