महागणपती मल्टीस्टेट पतसंस्थेच्या नवीन शाखेच्या शुभारंभ निघोज | प्रतिनिधी सध्याच्या काळात सहकारी पतसंस्था, बँका चालविणे म्हणजे काटेरी खुर्च...
महागणपती मल्टीस्टेट पतसंस्थेच्या नवीन शाखेच्या शुभारंभ
सध्याच्या काळात सहकारी पतसंस्था, बँका चालविणे म्हणजे काटेरी खुर्चीवर बसण्यासारखे अवघड काम आहे, असे प्रतिपादन पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी केले. निघोज येथे महागणपती मल्टी स्टेट पतसंस्थेच्या नवीन शाखेच्या शुभारंभ आमदार लंके व भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष विकास बेंगडे, उपाध्यक्ष संजय भालेकर, संचालक पवन हगवणे, राजेंद्र हुले, महेश शिंदे, माजी सभापती खंडू भुकन, घोडगंगा सहकारी कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे, टाकळी हाजीच्या सरपंच अरुणा घोडे, माजी सरपंच ठकाराम लंके, ज्येष्ठ सल्लागार सलीम भाई हावलदार, मुस्लिम समाजाचे शहराध्यक्ष रफिकभाई हवलदार, दिलीप ढवण, रुपेश ढवण, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी दत्ताञय चौधरी, पत्रकार व संस्थेचे सल्लागार सुरेश खोसे पाटील, गोरख लामखडे, बालाजी दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष अरुण लंके, दत्ता नरवडे, शोभना टिकेकर, अंजनी नरसाळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
आ. लंके म्हणाले की, निघोज सारख्या गावात वीस सहकारी पतसंस्था, बँका अगदी सुव्यवस्थित पध्दतीने सुरु असून पतसंस्था असो की बँका या माध्यमातून व्यवसायीकांना आर्थिक आधार मिळतो. जनतेला पाठबळ मिळते. विकास होण्याच्या दृष्टीने पतसंस्था व बँका यांचे योगदान मोठे आहे. पतसंस्थेचे चेअरमन विकास बेंगडे हे स्वत : मोठे बिल्डर असल्याने त्यांना सभासदांच्या ठेवींना जास्तीचे व्याज देणे शय असून कर्जपुरवठा कमी व्याजदराने करुन लोकहित साधण्याचे काम या पतसंस्थेच्या माध्यमातून होण्याची गरज असल्याची सुचना आमदार लंके यांनी केली आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटील यावेळी बोलताना म्हणाले की पतसंस्था चालविताना लोकांना चांगली सेवा द्या, त्यांच्या विश्वासास पात्र राहून काम करा अशी सुचना वळसे पाटील यांनी केली. पतसंस्थेचे चेअरमन विकास बेंगडे यांनी प्रास्ताविक करताना म्हणाले की, आम्ही अवघ्या सहा महिन्यांच्या कमी कालावधीत संस्थेच्या दहा शाखा स्थापन केल्या आणि त्या चांगल्या पध्दतीने सुरु आहे. सभासद, ठेवीदारांच्या विश्वास जिंकून पतसंस्था आणखी नावारूपाला आणू. बेरोजगार तरुणांना उदयोग धंदे उभे करण्यास मदत करण्याचा शब्द दिला आहे. या कार्यक्रमास संस्था पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS