पुणे / नगर सहयाद्री- महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दिग्गजांन...
पुणे / नगर सहयाद्री-
महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. तर काही पहिल्याच झटक्यात विजयी होऊन थेट सरपंच झाले. पहिल्याच झटक्यात सरपंच झाल्याने मित्राने महागडी फॉर्चुनर कारच गिफ्ट दिली.
आता मित्र सरपंच झाल्यावर जल्लोष तर होणारच. साधारणपणे मित्रासोबत काही चांगलं झालं की त्याच्याकडून पार्टी घेण्याची पद्धत असते. मात्र दत्तात्रयच्या मित्र परिवाराने उलट केलं. पहिल्याच झटक्यात सरपंच झाल्याने मित्राने महागडी फॉर्चुनर कारच गिफ्ट दिली. दत्तात्रय हरगुडे असं या फॉर्चुनर कार गिफ्ट मिळालेल्या नवनिर्वाचित सरपंचाचं नाव आहे. दत्तात्रय पुण्यातून केसनंद ग्रामपंचायतीतून पहिल्याच झटक्यात सरपंच म्हणून निवडून आला. आपला मित्र पहिल्याच झटक्यात सरपंच म्हणून निवडून आल्याची बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली. मित्रांनी एकच जल्लोष केला. सरपंच झाल्याने मित्राने महागडी फॉर्चुनर कारच गिफ्ट दिली आहे.
दत्तात्रय हरगुडेची पहिली प्रतिक्रिया
“सरपंचपदी निवड झाल्याने मला फॉचुनर कार मला गिफ्ट दिली यासाठी सर्व मित्रांचे आभार मानतो. या भेटीचा मी गावाच्या विकासासाठी 100 टक्के प्रयत्न करेन. मित्रांचं माझ्यावर असंच प्रेम रहावं”, असं म्हणत दत्तात्रय हरगुडेने मित्रांचे आभार मानले.
दत्तात्रय हरगुडेचा मित्राची प्रतिक्रिया
“आबा (दत्तात्रय) कधीच स्वत:वर खर्च करत नाहीत. त्यांनी गावासाठी आणि समाजासाठी खर्च केलाय. आबांनी आतापर्यंत समाजाला भरभरुन दिलं. आता आपण त्यांना देण्याची वेळ आहे. या जाणिवेतून आम्ही आबांना फॉर्चुनर कार गिफ्ट देण्याचं ठरवलं”, अशी प्रतिक्रिया दत्तात्रय यांच्या मित्रांनी दिली.
COMMENTS