नाशिक / नगर सहयाद्री - नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक एक अनोखा ट्विस्ट पहायला मिळाला. अनेक वर्षांपासून तांबे हे काँग्रेसचे इमानदार पाईक मा...
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक एक अनोखा ट्विस्ट पहायला मिळाला. अनेक वर्षांपासून तांबे हे काँग्रेसचे इमानदार पाईक मानले जात होते. सत्यजीत तांबे याचे सोशल मीडियावरुन काँग्रेस पक्षाशी घट असणारे नाते आत्ता हटवले आहे. सत्यजीत तांबे काँग्रेसमधून बाहेर पडणार का अशे प्रश्न निर्माण होत आहे. ते भाजपमध्ये जातील, असा अंदाज काहीजणांकडून व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ३० जानेवारी २०२३ ला मतदान होणार आहे. तर, २ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. तांबे पितापुत्रांनी शेवटच्या क्षणी काँग्रेस पक्षाला धक्का दिल्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये शुभांगी पाटील विरुद्ध सत्यजीत तांबे अशी दुरंगी लढत रंगणार आहे
नाशिक पदवीधरमध्ये भाजप शेवटच्या क्षणाला एखादा नवा डाव खेळणार का, याची चर्चा रंगली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे चित्र एका रात्रीत बदलण्याची क्षमता भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, ते गुरुवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
३० जानेवारीला नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे भाजप शेवटच्या क्षणी आपले पत्ते उघड करुन सत्यजीत तांबे यांच्या पाठिशी ताकद उभी करेल, असा राजकीय जाणकारांचा होरा आहे. या पार्श्वभूमीवर सुजय विखे-पाटील यांचे वक्तव्य सूचक मानले जात आहे.
नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भाजप नाशिकमध्ये कोणाला पाठिंबा देणार, असा प्रश्न सुजय विखे यांना विचारण्यात आला. त्यावर सुजय यांनी म्हटले की, हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे योग्यवेळी पक्षाचा निर्णय देतील. निवडणूक जवळ आली असली तरी एका रात्रीमध्ये निवडणूक बदलण्याची क्षमता नगर जिल्ह्याच्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये आहे. ज्या माणसाचं नाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून येईल, त्याला आम्ही पाठिंबा देऊ आणि रात्रीतून चित्र बदलून टाकू. याची अनुभूती सगळ्या जिल्ह्याला येईल, असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले.
COMMENTS