नाशिक / नगर सहयाद्री - नाशिकच्या चांदवड तालुक्यातील निमोण येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच वर्षांच्या चिमुकलीचा ...
नाशिकच्या चांदवड तालुक्यातील निमोण येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेजल सोमनाथ जाधव (वय ५) असे तिचे नाव आहे.
एका वृत्तसंस्थाच्या महितीनुसार, चिमुकली ही सकाळी घराजवळील शेतात शौचास गेली होती. या दरम्यान भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला करत लचके तोडले. कुत्र्यांच्या हल्ल्यात ती जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. मुलगी येईना म्हणून पहायला गेलेल्या कुटुंबाला ती मृत अवस्थेत आढळली.
कुठल्या तरी हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाल्याची वार्ता सर्वत्र पसरली होती. वनविभागाचे पथकाने घटनास्थळी धाव घेतली . त्यांनी तापसकारर्या दरम्यान कुठलाही माग मिळू शकला नाही. तपासाअंती कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
COMMENTS