नवनाथ तरुण मंडळाच्या वतीने जयंतीनिमित्त शालेय साहित्याचे वाटप अहमदनगर | नगर सह्याद्री महाराष्ट्र राज्याला थोर व्यक्तींचा वारसा मिळालेला आहे...
नवनाथ तरुण मंडळाच्या वतीने जयंतीनिमित्त शालेय साहित्याचे वाटप
अहमदनगर | नगर सह्याद्रीमहाराष्ट्र राज्याला थोर व्यक्तींचा वारसा मिळालेला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्यामूळे स्त्री साक्षर होण्यास मदत झाली आहे. एक महिला साक्षर झाली की संपूर्ण कुटुंब साक्षर होते. स्त्री शिक्षणामुळे महिलांनी आपापल्या क्षेत्रामध्ये क्रांती घडवली आहे. महाराष्ट्राने दिलेल्या विचारांवर देश चालत आहे. देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचे योगदान मोठे आहे. सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या विचारांची परंपरा व वारसा पुढच्या पिढीसाठी चालू ठेवला गेला पाहिजेत. ज्ञानदान दिल्याने वाढत असते. शिक्षणाच्या माध्यमातून कर्तव्यदक्ष पिढी घडत असते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे प्रत्येक महिलेमध्ये धाडस निर्माण झाले आहे. सुडके मळा येथील नवनाथ तरुण मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले असल्याने प्रतिपादन मनपा महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पाताई बोरुडे यांनी केले. सुडके मळा येथील नवनाथ तरुण मंडळाच्या वतीने परिसरातील लहान मुलांना शालेय साहित्याचे वाटप करताना मनपा महीला बालकल्याण समिती सभापती पुष्पाताई अनिल बोरुडे, स्वाती सुडके, अंजना सुडके, पुजा सुडके, विमल सुडके, सिंधुबाई सुडके, मनीषा सुडके, अलका सुडके. भाऊसाहेब सुडके, रावसाहेब सुडके, देविदास सुडके, सागर सुडके, महेश सुडके, संदिप सुडके, विशाल सुडके, सुरेश सुडके, पिटू आण्णा सुडके आदी उपस्थित होते.
यावेळी स्वाती सूडके म्हणाल्या की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सुडके मळा येथील नवनाथ तरुण मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या व मोबाईलच्या युगामध्ये शिक्षणाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. यासाठी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात देणे गरजेचे आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची दारे खुली केल्यामुळे आज महिला विविध क्षेत्रांमध्ये कामाचा ठसा उमटवत आहे असे त्या म्हणाल्या.
COMMENTS