आज आम्ही आमच्या घरातील सर्वात प्रिय व्यक्तींसमोर लग्न केले ज्यामुळे आम्हाला खूप आनंद आणि शांती मिळाली.
मुंबई / नगर सह्याद्री -
भारतीय फलंदाज केएल राहुलने सोमवारी (२३ जानेवारी) अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत लग्नगाठ बांधली. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर हा विवाहसोहळा पार पडला. नवविवाहित जोडप्याने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर फोटो शेअर केले आहेत. या दोघांच्या छायाचित्रांवर विविध क्षेत्रातील दिग्गज आपल्या प्रतिक्रिया देत अभिनंदन करत आहे.
जवळच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांच्या उपस्थितीत राहुल आणि आथियाने लग्न केले. दोघांनीही सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत लिहिले, "तुमच्या प्रकाशात, आम्ही प्रेम करायला शिकलो... आज आम्ही आमच्या घरातील सर्वात प्रिय व्यक्तींसमोर लग्न केले ज्यामुळे आम्हाला खूप आनंद आणि शांती मिळाली. कृतज्ञता आणि प्रेमाने भरलेल्या अंतःकरणाने, आमच्या प्रवासात तुमचे आशीर्वाद घ्या.
राहुलचे अभिनंदन करताना भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने लिहिले, "अभिनंदन." राहुलची आयपीएल फ्रँचायझी लखनऊ सुपरजायंट्सनेही दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह, युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा, भारतीय क्रिकेटपटू मयंक अग्रवाल, टेनिस स्टार सानिया मिर्झा, क्रिकेटपटू क्रुणाल पंड्या, माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, मुनाफ पटेल, भारतीय सलामीवीर शुभमन गिल आणि स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यासह अनेक दिग्गजांनी जा जोडप्यांना शुभेच्छा दिल्या.
केएल राहुल भारतीय कसोटी संघाचा कर्णधार आहे. आयपीएलमध्ये तो लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधारही आहे. आथिया शेट्टीचे वडील सुनील शेट्टी यांनी सांगितले की, आयपीएलनंतर रिसेप्शन होणार आहे. राहुल लवकरच टीम इंडियात सामील होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेतून त्याला विश्रांती देण्यात आली होती. आता तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दिसणार आहे.
COMMENTS