रस्त्याबाबत सुरु असलेले लोणी हवेली ग्रामस्थांचे उपोषण मागे सुपा | नगर सह्याद्री लोणी हवेली ते पारनेर या रस्त्याचे अनेक वर्षांपासून काम झाले ...
रस्त्याबाबत सुरु असलेले लोणी हवेली ग्रामस्थांचे उपोषण मागे
सुपा | नगर सह्याद्री
लोणी हवेली ते पारनेर या रस्त्याचे अनेक वर्षांपासून काम झाले नाही, जिल्हा परिषदेकडुन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा रस्ता हस्तांतरीत करावा व निधी मिळावा या मागणीकरता लोणी हवेली चे ग्रामस्थ उपोषणास मंगळवार दिनांक ३ जानेवारी २०२३ सकाळपासूच बसले होते. याबाबत रस्ता हस्तांतराची प्रक्रिया पुर्ण होऊन जिल्हा भाजप उपाध्यक्ष सुभाष दुधाडे यांनी खासदार डॉटर सुजय विखे पाटील यांच्याशी संपर्क करून यावर निधी टाकण्याची जबाबदारी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी घेतल्याने उपोषण दुपारी तीन वाजता सोडण्यात आले.
यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे, सुभाष दुधाडे, नगरसेवक युवराज पठारे, गटविकास अधिकारी किशोर माने, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपा अभियंता कानिटकर, शहराध्यक्ष किरण कोकाटे, खासदार विखेंचे स्वीय सहाय्यक दरेकर उपस्थितीत होते.
लोणी हवेली ते पारनेर हा दहा किलोमीटर चा रस्ता खराब असल्याने एस.टी ची वाहतूक ही बंद झाली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर अनेक अपघात होऊन तीन जणांचा मृत्युही झाला आहे. सदर रस्ता हा जिल्हा परिषदेकडुन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव देखील दिला. मात्र त्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याने ग्रामस्थांनी उपोषणाचा पवित्रा घेतला होता. मात्र खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यात लक्ष घातल्याने हा प्रश्न लवकर मार्गी लागला असे सुभाष दुधाडे यांनी सांगितले.
यावेळी शत्रुघ्न नवघन, कैलास सोंडकर, दादाभाऊ दुधाडे, संभाजी थोरे, दादाभाऊ कोल्हे, रमेश कोल्हे, दिलीप दुधाडे, प्रविण सोंडकर, ज्ञानदेव कोल्हे, दत्तात्रय दुधाडे उपस्थित होते.
COMMENTS