निघोज । नगर सह्याद्री खासदार डॉ. सुजय विखे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून निघोज गटाच्या कामाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण प...
निघोज । नगर सह्याद्री
खासदार डॉ. सुजय विखे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून निघोज गटाच्या कामाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी सांगितले.
खासदार सुजय विखे यांना वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन गेल्या 50 वर्षापासून दुर्लक्षित असणारा निघोज, वडनेर, चासकरवाडी, पाबळ, लोणी मावळा, अळकुटी, गारखिंडी या रस्त्याच्या कामासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून एकूण 10 कोटी 72 लक्ष रुपये एवढा भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. या रस्त्यामुळे या गावातील लोकांचा अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे
तसेच निघोज गटाला विकासाचे मॉडेल बनविताना विकासाची हीच घोडदौड कायम राखताना प्रत्येक गावात सातत्याने विकासाच्या योजना राबविताना जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई वराळ यांच्या माध्यमातून तसेच माजी अध्यक्ष शालिनी विखे यांच्या मार्गदर्शनाखाली पायाभूत सुविधा निर्माण केल्या.
या गटातील विविध गावातील सोयी सुविधा करता 02 कोटी 10 लक्ष एवढा विकास निधी उपलब्ध झाला असून डांबरीकरणासाठी रांधे ते बाभुळवाडे, लोणीमावळा ते देवीभोयरे, जवळा ते गुणोरे, दरोडी ते टेकाडे वस्ती, लोणीमावळा ते देवी भोयरे, साठा बंधार्यासाठी म्हसे खुर्द, कोहकडी, अंगणवाडी बांधकाम करणे निघोज गावठाण, लोणी मावळा, भक्तनिवास बांधणे म्हस्केवाडी, काँक्रिटीकरणासाठी गाडीलगाव, म्हसे खुर्द वीजपुरवठा गुणोरे, राळेगण थेरपाळ, गाडीलगाव पाण्याची टाकी बांधणे लोणीमावळा या कामांसाठी भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल सर्व गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ यांनी आभार मानले. व समाधान व्यक्त केले.
संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यावेळी म्हणाले गेली पाच वर्षात निघोज - आळकुटी जिल्हा परिषद गटाचा विकास करताना माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रेरणेने सर्वाधिक विकासकामे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. सातत्याने केलेल्या विकासकामांचा पाठपुरावा मोठ्या प्रमाणात केला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी सातत्याने विकासकामे दिल्याने जवळपास पंचवीस ते तीस कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उपलब्ध झाला.
व मोठ्या प्रमाणात विकासकामे करता आली. गेली पाच पंचवीस वर्षात झाली नाहीत एवढी कामे या पंचवार्षिक मध्ये झाली याचे सर्व श्रेय विखे पाटील यांनाच आहे. तसेच निघोज - आळकुटी रस्ता तसेच विविध विकासकामे करण्यासाठी जवळपास 12 कोटी 82 लाख रुपयांची कामे खासदार डॉ. विखे पाटील व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंजूर केली असून लवकरच ही कामे मार्गी लागणार असून या माध्यमातून निघोज - आळकुटी जिल्हा परिषद गटाचा विकास मोठ्या प्रमाणात होणार असल्याची माहिती वराळ पाटील यांनी दिली आहे.
खासदार सुजय विखे यांची वचनपूर्ती
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत निघोज - आळकुटी रस्ता तसेच अन्य रस्त्याच्या संदर्भात जनतेला आश्वासीत केले होते. यामध्ये निघोज - आळकुटी रस्त्याच्या संदर्भात 10 कोटी 72 लाख निधी मंजूर झाला आहे. यानंतर निघोज - गाडीलगाव - कोहकडी हा रस्ता लवकरच मंजूर होणार असून लवकरच निघोज येथील ग्रामीण रुग्णालय सुद्धा मंजूर होणार असल्याची माहिती संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी दिली आहे.
COMMENTS