नाशिक / नगर सहयाद्री- राज्यात पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी सर्व पक्षांची जाेरदार तयारी सुरु आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपाकडून काँग्र...
नाशिक / नगर सहयाद्री-
राज्यात पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी सर्व पक्षांची जाेरदार तयारी सुरु आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी देण्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे. या चर्चेस आज सत्यजीत तांबे यांनी स्वत:हून पुर्णविराम देत काेण काय म्हणते यापेक्षा मी काॅंग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे.
भाजपाकडून ऑफर असल्याची सर्व चर्चा निराधार आहे. मी भाजपात प्रवेश करणार असल्याची आवाई उठवली गेली आहे. मी माझ्या पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि राहणार.
नाशिक पदवीधर निवडणूकीसाठी काँग्रेसकडून आमदार डाॅ. सुधीर तांबे उद्या दुपारी दोन वाजता अर्ज दाखल करणार असल्याची खात्रीशिर माहिती सुत्रांकडून समजली आहे. विद्यमान आमदार सुधीर तांबे यांनाच पक्षाकडून उमेदवारी जाहीर हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणुकीत भाजपाकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याबाबतचा संभ्रम अजूनही मतदारसंघात कायम आहे. यंदा भाजपकडून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे यांना उमेदवारी मिळू शकले अशी जाेरदार चर्चा आहे.
COMMENTS