नागेश्वर मित्र मंडळाचा उपक्रम; पाणी वाचवा, जीवन वाचवाचा संदेश पारनेर | नगर सह्याद्री पारनेर येथील नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित राज...
नागेश्वर मित्र मंडळाचा उपक्रम; पाणी वाचवा, जीवन वाचवाचा संदेश
पारनेर | नगर सह्याद्रीपारनेर येथील नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पारनेर मॅरेथॉन स्पर्धा शनिवारी २१ जानेवारीला असल्याची माहिती मंडळाचे प्रमुख उदय शेरकर, कल्याण थोरात, गणेश कावरे, अनिकेत औटी, डॉ. नरेंद मुळे यांनी दिली. स्पर्धेचे यंदा २१ वे वर्षे असून यातून पाणी वाचवा, जीवन वाचवा हे बोधचिन्ह तुन संदेश आहे.
नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने गेल्या २१ वर्षेपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रात खेळण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून स्पर्धा आयोजन केले जाते. पारनेर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी असे मुले, मुली असे सहा शालेय गट असून यामध्ये फक्त पारनेर तालुयातील शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. खुल्या गटात मुले, मुली असे दोन्ही गट असून यात राज्यातील स्पर्धकांना सहभागी होता येईल. स्पर्धेसाठी पारनेर नगरपंचायत नगराध्यक्ष विजय औटी, उपनगराध्यक्ष सुरेखा अर्जुन भालेकर, सर्व नगरसेवक, महावीर उद्योग समूहाचे प्रमुख राजेश भंडारी, सह्याद्री एजन्सी पारनेर चे अश्विन कोल्हे, विघ्नहर्ता हॉस्पिटल व आयसीयू सेंटर पारनेरचे डॉ. बाळासाहेब कावरे, डॉ, विद्या कावरे, जय मातादी उद्योग समूहाचे प्रमुख मारूती रेपाळे, गायकवाड आयुर्वेदिक लिनिक, नगर आदी स्पर्धेचे सहप्रायोजक असल्याचे यांनी सांगितले. स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन मंडळाचे प्रमुख, धीरज महंडुळे, अश्विन कोल्हे, वैभव पानसरे, वैभव बडवे, सचिन वाटमारे, गणेश डेरे, वैभव पठारे, दिगंबर शिंदे, समीर शेख, आकाश जोशी, शेखर हांडे, रामचंद्र तराळ, मनोज गंधाडे, किरण शिंदे, दत्ता वाटमारे, प्रताप अंबुले, प्रसाद अंबुले, भास्कर कवाद, योगेश वाघ यांनी केले.
समाजसेवक अण्णा हजारे यांच्या निवृत्तीवेतनातून विजेत्यांना ट्रॉफी
पारनेर मॅरेथॉन स्पर्धेसाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे स्वतः च्या निवृत्तीवेतनाच्या रकमेतून दरवर्षी सर्व गटातील विजेत्यांना ट्रॉफी देत आहेत. अण्णा हजारे यांच्या मुळे दरवर्षी आकर्षक ट्रॉफी विजेत्यांना मिळत आहे.
COMMENTS