सांगली / नगर सहयाद्री- सांगलीतील मिरजमध्ये मध्यरात्री पाडकाम करण्यात आलं. मध्यरात्री दोन वाजता एसटी स्टॅन्डजवळ हे पाडकाम करण्यात आलं आहे. ...
सांगली / नगर सहयाद्री-
सांगलीतील मिरजमध्ये मध्यरात्री पाडकाम करण्यात आलं. मध्यरात्री दोन वाजता एसटी स्टॅन्डजवळ हे पाडकाम करण्यात आलं आहे. या पाडकामावर स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे. भाजपचे विधान परिषदेतेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्या विरोधात स्थानिक आक्रमक झाले आहेत.
सदर वादग्रस्त जागेचा निकाल ब्रम्हानंद पडळकर यांच्या बाजुने लागला आहे. महापालिकेनं नोटीस दिल्यानं हे अतिक्रमण हटवल्याचा दावा ब्रम्हानंद पडळकरांनी केला आहे. अतिक्रमण हटवण्याला गाळ्यातील भाडेकरुंनी विरोध केला आहे.
जेसीबीने हॉटेल, दुकान गाळे जमीनदोस्त केल्यानंतर त्या गाळ्यामधील भाडेकरूंनी या घटनेला विरोध केला. जागेचा ताबा घेण्यासाठी गाळे पाडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ही घटना छत्रपती शिवाजी महाराज रोडवर बसस्थानकाशेजारी घडली. घटनास्थळी रात्रीपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागरिकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे.
जेसीबीच्या काचांची तोडफोड देखील करण्यात आली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकरांनी ही जागा घेतल्याचा दावा केला जात आहे. या जागेचा निकाल ब्रम्हानंद पडळकर यांच्या बाजुने लागल्याचे सांगितले जात आहे. याबाबत महापालिकेने अतिक्रमण काढाची नोटीस दिली होती. त्यानंतर हे गाळे पाडण्यात आले आहेत. पाडापाडी सुरु असताना गाळेधारक मात्र चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं. गाळेधारकांनी पाडापाडी करण्यास विरोध केला. यातून दोन गटात वाद झाला. यामध्ये गाळेधारकांनी जेसीबीच्या कांचा फोडल्या आहेत. सध्या काम थांबले आहे.
गोपीचंद पडळकर, ब्रम्हानंद पडळकर आणि त्यांच्यासोबत आलेले दीड-दोन हजार गुंड या सगळ्यांवर योग्य त्या कलमानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करतो”, असं स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
या सगळ्या प्रकरणवर आम्ही गोपीचंद पडळकर यांच्याशी फोनवरून बातचित केली. त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मिरजेत दुकानं पाडण्यात आली आहेत. ते पाडकाम कायदेशीर आहेत, असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी फोनवरून सांगितलं.
COMMENTS