जळगाव / नगर सहयाद्री- शहरातील शिवकॉलनी परिसरातील बारावीच्या विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दिशा विठ्ठल नाईक असे मृत विद्यार...
जळगाव / नगर सहयाद्री-
शहरातील शिवकॉलनी परिसरातील बारावीच्या विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दिशा विठ्ठल नाईक असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
दिशा जळगाव शहरातील एका महाविद्यालयात बारावीला शिक्षण घेत होती. दिशाच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. तर मोठा भाऊ पुण्यात शिक्षण घेत आहे. जळगाव शहरातील श्री अपार्टमेंटमध्ये दिशा विठ्ठल नाईक (वय १७) आईसह वास्तव्यास होती. दिशा हिची आई जिल्हा परिषदेत (अनुकंपावर) नोकरीला असून, नेहमीप्रमाणे त्या कामावर गेल्या होत्या. शुक्रवारी दिशा घरी एकटी असताना तिने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी सातला आई काम आवरल्यावर घरी अली तिला घरात दिशा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळताच त्यांनी आक्रोश केला.
घटनेची माहिती मिळाल्यावर रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जाधव यांनी दिशा नाईक हिला मृत घोषित केले. याबाबत डॉ. दीपक जाधव यांनी दिलेल्या माहितीवरून रामानंदनगर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
COMMENTS