बार्शी / नगर सह्याद्री - मेसॅजच्या आणि फाेनवरुन संपर्क साधत एका शिक्षकाने शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याची घटना बार्शी शहरात घडली. या प्रकरणी ...
बार्शी / नगर सह्याद्री -
मेसॅजच्या आणि फाेनवरुन संपर्क साधत एका शिक्षकाने शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याची घटना बार्शी शहरात घडली. या प्रकरणी पाेलिसांना संबंधित शिक्षकास अटक केली. संबंधित शिक्षकाची न्यायालयाने चार दिवसांच्या पाेलिस काेठडीत रवानगी केली आहे.
पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार संबंधित शिक्षकाचे नाव राजेश पांडेय ( रा . सिद्धेश्वरनगर, कासारवाडी रोड, बार्शी) असे आहे. आठवीत शिकणारी मुलगी अभ्यासामधील अडी अडचणी सोडवण्यासाठी शिक्षकाशी स्नॅप चॅटच्या माध्यमातून चॅटींग करीत असे. त्यानंतर शिक्षकाने दोन दिवस आठ ते दहा वेळा मुलीला फोन करुन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तिला मानसिक त्रास दिला.
संबंधित मुलीने शिक्षकास पाॅझिटीव्ह रिप्लाय दिला नाही. त्यामुळे शिक्षक नाराज झाला. त्याने मुली जिवे टाकण्याची धमकी दिली असे तिच्या पालकांनी फिर्यादीत नमूद केले आहे. ही घटना २० डिसेंबर २०२२ ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीत घडली आहे असेही पाेलिसांनी सांगितले.
पाेलिसांनी शिक्षकास अटक केली. त्याच्यावर पाेक्साेचा गुन्हा दाखल केला. त्यास न्यायालयाने चार दिवसांची पाेलिस काेठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक सारिका गटकूळ अधिक तपास करीत आहेत.
COMMENTS