अहमदनगर / नगर सहयाद्री - यवत मधील भीमा नदी पात्रात ७ मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना घडली. या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा...
अहमदनगर / नगर सहयाद्री -
यवत मधील भीमा नदी पात्रात ७ मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना घडली. या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. हे मृतदेह एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. अंत्यविधी केलेले सात पैकी तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या
एका वृत्तसंस्थाच्या मिळालेल्या माहितीनुसार,पुण्यातील ससून रुग्णालयातील एका टीमने हे अंत्याविधी झालेले मृतदेह बाहेर काढले आहेत. तिन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करायचे असल्याने तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
शवविच्छेदनासाठी तिन्ही मृतदेह पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल केले गेले आहेत. रुग्णालयाचे एक विशेष पथक या तिन्ही व्यक्तींचे शवविच्छेदन करणार आहे. या सात जणांची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांचे एकूण ५ पथक या घटनेचा छडा लावण्यासाठी कार्यरत आहेत.
COMMENTS