अमरावती / नगर सहयाद्री- अमरावतीमधील पीडीएमसी रुग्णालयात, अल्पवयीन मुलीने मुलीला जन्म दिल्याची घटना घडली आहे. सोळा वर्षाची अल्पवयीन शाळकरी मु...
अमरावती / नगर सहयाद्री-
अमरावतीमधील पीडीएमसी रुग्णालयात, अल्पवयीन मुलीने मुलीला जन्म दिल्याची घटना घडली आहे. सोळा वर्षाची अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार होऊन गर्भधारणा झाल्याची माहिती समोर अली आहे. या घटनेने खळबळ माजली आहे. नगर भागात ही मुलगी शिक्षणासाठी भाड्याने राहत होती.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका सोळा वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीला बलात्कार गर्भधारणा होऊन तिने मुलीला जन्म दिल्याची धक्कादायक घटना अमरावती येथील पीडीएमसी रुग्णालयात उघड आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गाडगे नगर भागात तीन मुली शिक्षणासाठी भाड्याने राहत होत्या.
त्यापैकी एका सोळा वर्षीय मुलीचे सोमवारी अचानक पोट दुखू लागल्याने तिला रात्री उशिरा पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तपासणी दरम्यान ती गर्भवती असल्याचे निदान करण्यात आले. यासंबंधित गाडगे नगर पोलीस व बालकल्याण समितीला माहित देण्यात आली व तिच्या वयाची खात्री देखील करण्यात आली.
दरम्यान मंगळवारी तिला वेदना होऊन तिने स्त्री अर्बकाला जन्म दिला. त्या अल्पवयीन मुलीने आरोपीचा मोबाईल नंबर पोलिसांना दिला व पुढे तिची चौकशी केली असता तो आरोपी२३ वर्षाचा व मुलगी ही १६ वर्षाची असल्याची माहिती समोर आली आहे.आरोपीची ओळख पटल्यानंतर त्याच्यावर काल रात्री उशिरापर्यंत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आता पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
COMMENTS