नांदेडमध्ये भोकरमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून ग्रामसेवक असलेल्या भावजीने महिला नायब तहसीलदार मेव्हणीवर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची...
नांदेडमध्ये भोकरमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून ग्रामसेवक असलेल्या भावजीने महिला नायब तहसीलदार मेव्हणीवर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.
नांदेड / नगर सहयाद्री -
नांदेडमधून धक्कादायक बातमी समोर अली आहे. नांदेडमध्ये भोकर शहरातील देशपांडे गल्लीत सदर घटना घडली आहेप्रॉपर्टीच्या वादातून ग्रामसेवक असलेल्या भावजीने महिला नायब तहसीलदार मेव्हणीवर धारधार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. . शेजाऱ्यांनी तातडीने हल्ला करणाऱ्या भावजीला पकडल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
एका वृत्तसंस्थाच्यामिळालेल्या माहितीनुसार, रेखा चामणार असं धारधार शस्त्राच्या हल्ल्यातून बचावलेल्या महिला नायब तहसीलदाराचं नाव आहे. तर बालाजी नारायण हाके असं हल्ला करणाऱ्या ग्रामसेवक भावजीचं नाव आहे. रेखा चामणार या भोकर तहसीलात पुरवठा विभागात नायब तसहसीलदार पदावर कार्यकरत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामसेवक बालाजी नारायण हाके याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेखा चामणार या नांदेड भोकर तहसीलमध्ये पुरवठा विभागात नायब तहसीलदार पदावर कार्यरत आहेत. आज सकाळी आॅफीससाठी घरा बाहेर पडण्याच्या तयारीत होत्या. त्यामुळे नेहमी प्रमाणे रेखा चामणार या ऑफिससाठी निघाल्या.
त्यावेळी बालाजी हाके घरी आला. त्याने अचानक हातातील धारधार शस्त्रान चामणार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेजाऱ्यांनी हाकेला पकडले आणि पोलिसाच्या स्वाधीन केले. या प्रकरणी रेखा चामणार यांनी दिलेल्या तक्रारीवरून भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS