नवी दिल्ली / वृत्तसंस्था- पुलवामा जम्मू काश्मीरमधून एक संतापजनक घटना उघडकीस आली. एका नराधम दीराने आपल्याच वहिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न...
नवी दिल्ली / वृत्तसंस्था-
पुलवामा जम्मू काश्मीरमधून एक संतापजनक घटना उघडकीस आली. एका नराधम दीराने आपल्याच वहिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या कृत्याला विरोध केला असता, त्याने वहिनीची गळा दाबून हत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.
मंगळवारी (१० जानेवारी) घरात कुणी नसल्याची संधी साधून त्याने वहिनीसोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्तापित करण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीला वहिनीने विरोध केला असता, आरोपीने गळा दाबून तिची हत्या केली.
मृत महिलेचा पती हा कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. त्यावेळी घरात फक्त मृत महिला आणि तिचा दीर आरोपी जुबेर हे दोघेच होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जुबेर याची मृत शबाना हिच्यावर वाईट नजर होती.
हे घृणास्पद कृत्य केल्यानंतर आरोपीने घरातून पळ काढला. सकाळ होऊन सुद्धा घरातून कुणीच बाहेर न आल्याने शेजारील महिलेने दार ठोठावले. मात्र, कुणी प्रतिसाद देत नसल्याने तिने खिडकीतून डोकावून बघितले असता, हा प्रकार उघडकीस आला.
जुबेर (वय २१ वर्ष) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून शबाना (वय २९ वर्ष) असं मृत महिलेचं नाव आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील ही घटना घडली आहे.
COMMENTS