अहमदनगर / नगर सहयाद्री- नाशिक पदवीधर निवडणुकीतून आज धनंजय जाधव यांनी आज माघार घेतली आहे. पक्ष हितासाठी माझा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे ...
अहमदनगर / नगर सहयाद्री-
नाशिक पदवीधर निवडणुकीतून आज धनंजय जाधव यांनी आज माघार घेतली आहे. पक्ष हितासाठी माझा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे जाधव यांनी नमूद केले. भाजप पक्ष जसा आदेश देईल त्या उमेदवारास निवडून आणण्यास आम्ही प्रयत्न करु असेही जाधव यांनी स्पष्ट केले.
भाजप कार्यकर्ते धनंजय जाधव यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरला हाेता. जाधव यांनी पक्ष एबी फाॅर्म देईल अशी अपेक्षा हाेती. मात्र तसे झाले नाही. धनंजय जाधव हे मंत्री विखे पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांनी आज पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतून माघार घेतली.
COMMENTS