मुंबई । नगर सह्याद्री - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिर्डीहून हेलिकॉप्टरने बीड कडे रवाना होण्यापूर्वी शिर्डी विमानतळावर महसूल...
मुंबई । नगर सह्याद्री -
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिर्डीहून हेलिकॉप्टरने बीड कडे रवाना होण्यापूर्वी शिर्डी विमानतळावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांची घेतली भेट घेतली आहे. यावेळी तिळगुळ देऊन विखे पाटलांनी फडणवीसांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहे.
तर दोघांमध्ये काहीवेळ खाजगीत चर्चा देखील झाली आहे. फडणवीस आणि विखे यांच्यात नाशिक पदवीधर उमेदवारासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी मीडियाशी संवाद साधला आहे.
काँग्रेसच्या निष्ठा आणि इतर बाबतीत बाळासाहेब थोरात यांनी अनेकदा ज्ञान पाझळलंय. उद्या महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित होतील त्या उमेदवाराची जाहीर सभा थोरातांनी संगमनेरात घेतली पाहिजे असा टोला विखे पाटलांनी बाळासाहेब थोरात यांना लगावला आहे.
शुभांगी पाटील यांच्याबद्दल विचारले असता विखे पाटील म्हणाले की, प्रत्येक उमेदवार आपला पर्याय शोधत असतो. महाविकास आघाडीने त्यांच्यासाठी उमेदवार शोधला आहे. उद्या भाजपाने सत्यजित तांबेना पाठिंबा दिला तर त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचे विखे म्हणाले आहे.
पक्षाच्या विचाराशी फारकत घेऊन काँग्रेसची वाटचाल सुरू आहे. भारत जोडो यात्रा काँग्रेससाठी नव्हे तर राहुल गांधींसाठीच असून स्वतःची छबी वाढवण्याचा यामध्ये प्रयत्न करण्यात आला आहे. महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसची अशीच अवस्था आहे. सुजय विखें प्रमाणेच सत्यजित ही बाहेर पडेल असं मला वाटतंय असे वक्तव्य करत विखे पाटलांनी पदवीधरसाठी सत्यजित तांबेंच भाजपचे (BJP) उमेदवार असतील असे संकेत दिले आहे.
गोपीनाथ मुंडेंसारख्या नेत्यांमूळे महाराष्ट्रात भाजपाचा बोलबाला झाला आहे. नाराज होऊन पंकजा मुंडे काही निर्णय घेतील असं मला वाटत नाही. सत्ता येते जाते, पद मिळतात मिळत नाही, मात्र पक्षासाठी पंकजा मुंडे यांचे योगदान मोठे असल्याचे विखे पाटील म्हणाले आहे.
COMMENTS