मुंबई । नगर सह्याद्री - सुंदर दिसणे हा प्रतेक स्त्रीचा अधिकार आहे. सुंदर दिसण्यासाठी सुंदर असनं महत्त्वाचं आहे असं काही नाही. त्यामुळं अन...
मुंबई । नगर सह्याद्री -
सुंदर दिसणे हा प्रतेक स्त्रीचा अधिकार आहे. सुंदर दिसण्यासाठी सुंदर असनं महत्त्वाचं आहे असं काही नाही. त्यामुळं अनेक स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी अनेक गोष्टी करत असतात अगदी जुन्या काळापासून स्त्रिया सौंदर्य प्रसाधने वापरतात. परंतू याच सौंदर्यप्रसाधनांमुळे तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. तुम्हाला तुमची त्वचा निरोगी ठेवायची असेल तर तुम्हाला त्वचेशी निगडित असलेल्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
आपण शरीरावर शाम्पू, साबण, बॉडी लोशन त्याचबरोबर मेकअप करताना फाउंडेशन, आयलायनर, मक्सरा, आयशाडो, लपिस्टिक अशा प्रकारची सौंदर्यप्रसाधने वापरतो. परंतू ही प्रसाधने तुमच्या त्वचेला घातक ठरू शकतात. तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टविषयी योग्य ती माहिती असलीच पाहिजे.
तुम्ही वापरत असलेल्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये केमिकल युक्त पदार्थांचा समावेश आहे. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर काळे डाग, चेहऱ्याला खाज येणे, लाल चट्टे, पुरळासारखे दाने, त्वचा खराब होणे अशा पद्धतीची लक्षणे दिसून येतात. असा खरब झालेला चेहरा कुणालाच नाही आवडत आणि यासाठीच प्रत्येकाने आपल्या चेहऱ्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे.
या मेकअप प्रॉडक्टमध्ये अत्यंत हानिकारक केमिकल चा समावेश असतो. आयमेकअप करताना आपण जे प्रॉडक्ट वापरतो त्यामुळे डोळ्यांना सूज येणे, डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे तयार होणे त्याचबरोबर डोळे लाल होणे - चुरचुरणे अशा गंभीर समस्या उद्भवतात.
आपल्या शरीरात इम्यून सिस्टम असते. जी शरीराबाहेर लागणाऱ्या पदार्थांवर पटकन रिएक्शन दिसते यालाच आपण एलर्जी असं म्हणतो. एलर्जीमुळे जास्त प्रमाणात त्रास नाही होतं पण काही वेळा हीच एलर्जी जीवघेणी सुध्दा ठरू शकते.
अमेरिकेने फूड अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशनने एक लिस्ट बनवली आहे ज्यामध्ये ब्युटी प्रॉडक्टमध्ये नॅचरल रबर, सुगंधित वस्तू, प्रिजरवेटीव, डाई आणि मेटल ह्या पाच समग्र्यांमुळे कॉमन एलर्जी होत असल्याचं दर्शवलं आहे. जर तुमच्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये हेअर बोंडिंग, बॉडी पेंट्स, आय लाइनर, बनावट पापण्यांचा गम यांसारख्या प्रॉडक्टमध्ये नॅचरल रबर किंवा लेटक्स असते. यामुळे बहुतांश लोकांना त्वचेचा रोग होऊ शकतो.
त्याचबरोबर आपण जे सनस्क्रीन लावतो त्यामध्ये टाईटेनियम डाय-ऑक्साइड मिसळलेली असते. सौंदर्यप्रसाधनांमध्ये बऱ्याचदा सुगंधित वस्तूंचा वापर केला जातो. यामध्ये इमाइल सीनामल, इमाइलसिनामिल अल्कोहोल, बेंजिल अल्कोहोल, सीनामाईल अल्कोहोल यांसारखे घातक केमिकल समाविष्ट असतात.
त्यामुळे श्वासोच्छवासास त्रास होणे, नाका मधून पाणी येणे यांसारख्या समस्यांना बळी पडावे लागते. या घातक पदार्थांपासून वाचण्यासाठी त्या प्रॉडक्टमध्ये कोणकोणत्या सामग्रीचा वापर केला आहे त्याची पडताळणी करून पहा आणि कोणतीही क्रीम चेहऱ्याला लावण्याआधी पॅच टेस्ट जरूर करा.
COMMENTS