मुंबई / नगर सहयाद्री- अमेरिका (USA) देशातील एक बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. अमेरिकेतील टेक्सासमधील ही गोष्ट आहे. दोन जुळ्या ...
मुंबई / नगर सहयाद्री-
अमेरिका (USA) देशातील एक बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. अमेरिकेतील टेक्सासमधील ही गोष्ट आहे. दोन जुळ्या मुली झाल्या आहेत. त्यांच्या आई-वडिलांना प्रचंड आनंद झाला आहे. परंतु दोघींच्या वयात एका वर्षाचं अंतर आहे.
आई वडिलांना दोन जुळ्या मुली झाल्यामुळे ते अधिक आनंदात आहेत. त्यांनी एनी आणि एफी राज अशी मुलींची नाव ठेवली आहेत. त्यामध्ये एनी या मुलीचा जन्म 31 डिसेंबरला रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी झाला. दुसरी मुलगी एफी रोज हीचा जन्म 1 जानेवारीला 12 वाजून 5 मिनिटांनी झाला. मुलींच्या आईने ही गोष्ट फेसबुकला शेअर केली आहे. विशेष म्हणजे मुलीच्या आईने दोघीच्या जन्माची वेळ शेअर केली आहे.
माझ्या दोन्ही मुलीची तब्येत सध्या एकदम व्यवस्थित आहे. मुलांचं वजन सुध्दा एकदम व्यवस्थित आहे. मुलींची आई केली या म्हणतात, की मुलींच्या जन्मापासून त्यांचे पती क्लिफ अधिक खूश आहेत.
COMMENTS