मुंबई / नगर सहयाद्री- राज्यात शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडीचे नेते नेहमीच त्यांंच्यावर टीका करतअसण्याची संधी शोधत अ...
मुंबई / नगर सहयाद्री-
राज्यात शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडीचे नेते नेहमीच त्यांंच्यावर टीका करतअसण्याची संधी शोधत असतात. त्याचबरोबर राज्यातील मोठे मोठे प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्यानेही त्यांच्यावर टीका होत असते. सध्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ट्विटची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. ज्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे - आणि देवेंद्र फडणवीसांना सणसणीट टोला लगावला आहे.
जयंत पाटील यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये तीन बॅनर्स दिसत आहेत. तिन्ही बॅनर्सवर मजकूर लिहिलेला दिसत आहे. एका बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दिसत आहे. एका बॅनरवर दूध मागोंगे दूध देंगे, असं लिहिलं आहे. दुसऱ्या बॅनरवर खीर मांगोंगे खीर देंगे, असं लिहिलं आहे.
ज्या तिसऱ्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे, त्यावर वेगळाच मजकूर लिहिला आहे. इन्व्हेस्टमेंट मांगोगे, यूपी, गुजरात को देंगे, असं त्यात म्हटलं आहे.
हा फोटो शेअर करून त्यावर जयंत पाटील यांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फोटोतील प्रतिमा व शब्दांचा वास्तवाशी काही संबंध असल्यास निव्वळ योगायोग समजावा!, असं खोचक ट्विट पाटील यांनी केलं आहे.
COMMENTS