अहमदनगर । नगर सह्याद्री तोंडाला मास्क लावुन काळया रंगाच्या विना नंबरच्या पल्सर मोटर सायकलवर आलेल्या दोघांनी पिकअप गाडी थांबवायला लावत फाय...
अहमदनगर । नगर सह्याद्री
तोंडाला मास्क लावुन काळया रंगाच्या विना नंबरच्या पल्सर मोटर सायकलवर आलेल्या दोघांनी पिकअप गाडी थांबवायला लावत फायनान्स चे हप्ते थकल्याचे सांगत पिकअप चालकास आडबाजूला नेवून लुटल्याची घटना केडगाव परिसरात शुक्रवारी (दि.6) रात्री घडली.
याबाबत पिकअप चालक सचिन बाळासाहेब गायकवाड (वय 24, रा. तळणी ता. शेवगांव) याने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादी गायकवाड हा मोहसीन मुस्ताक शेख यांचे मालकीचे पिकअप गाडीवर (क्र.एम. एच.16 ए. वाय. 3355), गेल्या 2 वर्षापासुन चालक म्हणुन काम करतो. शुक्रवारी (दि.6 दुपारी 3 च्या सुमारास तो शेवगांव येथुन पिकअप गाडी घेवुन कोंबडयांचे खादय घेण्यासाठी काव्या ट्रेडींग कंपनी, सुपा ता.पारनेर येथे गेला होतो. व पिकअप गाडीमध्ये कोंबडयाचे खादय भारुन पुन्हा रात्री 7.30 च्या सुमारास परत नगर मार्गे शेवगांवकडे जाण्यासाठी निघाला होता. तो केडगांव जवळ आला असता त्याचे पिकअप गाडीचे मागे दोन इसम तोंडाला मास्क लावुन त्यांचे जवळील विना नंबरच्या पल्सर मोटर सायकलवर आले व पिकअपला हात करून त्याला थांबण्याचा इशारा केला. त्यामुळे त्याने पिकअप रोडचे कडेला अंबिका हॉटेल समोर थांबविली.
त्यावेळी त्यांनी आम्ही फायनान्सचे कर्मचारी आहोत. चालकाने त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यातील एका इसमाने त्याचे नाव संकेत पवार असे सांगितले व मला म्हणाला की, तुझ्या गाडीचे फायनान्सचे हप्ते थकलेले आहेत. त्यावर चालकाने त्यांना सांगितले की, माझी गाडी सुमारे 9 ते 10 वर्षापुर्वीची असुन आमचे गाडीवर कुठलेही फायनान्सचे हप्ते थकलेले नाहीत. असे म्हणाल्यावर त्यांनी त्याला पिक अप गाडी केडगांव पोलीस चौकीला घेण्यास सांगितली. त्यानंतर गाडी पोलिस चौकी समोर नेल्यावर त्यांनी गाडी सोडण्यासाठी 5 हजारांची मागणी केली.
चालकाकडे पैसे नसल्याने त्याने गाडीमालक मोहसीन शेख यास फोन करून पैसे पाठविण्यास सांगितले.मालकाने माझ्याकडे फक्त 1 हजार रुपये आहेत असे सांगत फोन पे ते पाठविले. त्यानंतर त्या दोन्ही इसमांनी त्याचे जवळील पल्सर मोटर सायकलवर दोघांचे मध्ये बसवुन तेथे जवळच असलेल्या पेट्रोलपंपावर त्याला घेवुन गेले व पैसे काढून आण असे सांगितले. त्यावेळी रात्रीचे 9.30 वाजले होते. तो पेट्रोल पंपावर पैसे घेण्यासाठी गेला मात्र तेथे त्याला पैसे मिळाले नाहीत. त्यावेळी त्या दोन इसमांनी तेथेच त्याला बाजुला अंधारात नेवुन त्याच्या खिशातील 1 हजार 700 रुपये बळजबरीने काढुन घेतले. व तेथून पोबारा केला.
या घटनेनंतर पिकअप चालक सचिन गायकवाड याने कोतवाली पोलिस ठाण्यात येवून फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात 2 इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS