अहमदनगर | नगर सह्याद्री येथील दौंड रोडवर असलेल्या कायनेटीक ग्रीन एनर्जी कंपनीच्या स्टोअर रूममधून दोन लाख रूपये किंमतीच्या दुचाकीच्या १० चा...
अहमदनगर | नगर सह्याद्री
येथील दौंड रोडवर असलेल्या कायनेटीक ग्रीन एनर्जी कंपनीच्या स्टोअर रूममधून दोन लाख रूपये किंमतीच्या दुचाकीच्या १० चार्जिक बॅटर्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या.
१ ऑटोबर, २०२२ ते ३१ डिसेंबर, २०२२ दरम्यान ही घटना घडली आहे.या प्रकरणी कंपनीचे स्टोअर किपर दिवाकर समसेर सिंग (वय ४४ रा. भोसले आखाडा, नगर, मुळ रा. सरीयामा, सुहावल, जि. आयोध्या, उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. सिंग यांच्यासोबत ओंकार परभणे, राहुल गावडे, अमोल बर्वे, विनायक केंद्रे कंपनीत काम करतात. कंपनीच्या स्टोअर रूममध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून माल येतो व तो सिंग यांच्या ताब्यात असतो.
ऑर्डरप्रमाणे स्टोअरमधून माल बाहेर पाठविला जातो. सदर स्टोअरमधील मालाबाबत तीन महिन्यातून एक वेळा आवक झालेला माल बाहेर पाठविलेला माल व शिल्लक मालाबाबत हिशोब तपासणी करण्याचे काम सिंग यांचे आहे. त्यांनी ३१ डिसेंबर रोजी हिशोब तपासणी केली असता त्यांना कंपनीमधील दुचाकीच्या १० चार्जिकच्या बॅटर्या कमी दिसल्या. यानंतर सिंग यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
COMMENTS