अहमदनगर । नगर सह्याद्री नाताळ सणाचा फराळ कार्यक्रम सुरू असताना अचानक सात जणांनी घरात घुसून दोघा मित्रांना तलवार, लोखंडी रॉडने मारहाण करून...
अहमदनगर । नगर सह्याद्री
नाताळ सणाचा फराळ कार्यक्रम सुरू असताना अचानक सात जणांनी घरात घुसून दोघा मित्रांना तलवार, लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. विकास रावसाहेब आव्हाड (वय 32 रा. तेलीखुंट) व राहुल प्रवीण खोजे असे जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 29 डिसेंबरला रात्री तेलीखुंट येथे ही घटना घडली.
जखमी आव्हाड यांनी उपचारादरम्यान तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून सचिन ठाणगे, ओम भिंगारदिवे, केतन शिंदे, विशाल गायकवाड, अंकुश दिकोंडा, नवनाथ राठोड, अमित चिमाल (सर्व रा. दातरंगे मळा, नालेगाव) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 29 डिसेंबरला रात्री आव्हाड यांनी त्यांच्या घरी नाताळनिमित्त फराळाचा कार्यक्रम ठेवला होता. यासाठी त्यांच्या घरातील व्यक्तींसह नातेवाईक जमले होते. रात्री पावणे नऊच्या सुमारास अचानक आरोपींनी आव्हाड यांच्या घरात प्रवेश करून विनाकारण शिवीगाळ केली. आव्हाड त्यांना समजून सांगण्यास गेले असता त्यांनी आव्हाड यांच्यासह त्यांचे मित्र खोजे यांना मारहाण करत घराबाहेर ओढत नेले. सचिन ठाणगे याने तलवारीने आव्हाड यांच्या डोक्यात वार केला. ओम भिंगारदिवे याने लोखंडी रॉडने मारून जखमी केले. खोजे यांना लाकडी दांडके, लोखंडी रॉडने मारहाण केली. तुम्ही दोघे आमच्या नादी लागले तर तुम्हाला व तुमच्या कुटूंबाला बंदुकीच्या गोळ्या घालून ठार मारून टाकीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
COMMENTS