मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपल्याच शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला ककेल्याने राजकीय वर्तुळात ...
भाजप खासदार शेट्टी यांनी एका कार्यक्रमात जाहीर मंचावरून सांगितले की, त्यांनी कुणाल केरकर नावाच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला साईबाबा नगर (बोरिवली) येथे व्यायामशाळा बांधून दिली होती. ही व्यायामशाळा व्यवस्थित चालत होती. केरकर भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमाला १०० ते २०० कार्यकर्त्यांसह उपस्थित असायचा. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात ती व्यायामशाळा बंद करण्यात आली होती. असे असतानाही माझ्या पक्षाच्या नगरसेविका बिना दोशी, माझ्या पक्षाचे आमदार, भाजपचे बोरिवली मंडल अध्यक्ष आणि उत्तर मुंबई भाजप संघटनेच्या पदाधिकार्यांनी काहीही केले नाही. त्यामुळे तीन हजार चौरस फुटांची व्यायामशाळा भाजप कार्यकर्त्याच्या हातातून गेली. पक्षाचे नेतेच कार्यकर्त्याला मदत करणार नसतील तर तुमच्यासोबत कोण काम करणार? असा सवाल त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना केला आहे.
जया शेट्टी नावाच्या कबड्डीपटूला छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार मिळाला. त्यांनी जिच्याशी विवाह केला त्या महिला कबड्डीपटूलाही छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार मिळाला. या दोन्ही कबड्डीपटूंचा मुलगा गौरव याला सुवर्णपदक आणि छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार मिळाला. हे कबड्डीपटू महाराष्ट्र सरकारकडे एक घराची मागणी करत आहेत. या खेळाडूंच्या मागणीबाबत मी माझ्या पक्षाचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सांगितले, मात्र ते न्यायालयाचा हवाला देऊन मागणी फेटाळत आहेत, अशा शब्दांत भाजप खासदाराने आपल्याच सरकारच्या मंत्र्याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
COMMENTS