सल्ला राऊतांनी नव्हे, ठाकरेंनी द्यावा मुंबई । वृत्तसंस्था - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाने मनुस्मृती सोडावी. आम्ही त्या...
सल्ला राऊतांनी नव्हे, ठाकरेंनी द्यावा
मुंबई । वृत्तसंस्था -
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाने मनुस्मृती सोडावी. आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहोत, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
ते मुंबईत बोलत होते. शरद पवार हे भाजपचेच असल्याचे वक्तव्य आंबेडकरांनी केले होते. याबद्दल विचारले असता ते म्हणाले, पवारांबाबतचे माझे वक्तव्य भूतकाळातील अनुभवावरून आहे. आपला शत्रू कोण आणि मित्र कोण हे ओळखायला हवे. कुठलाही राजकीय पक्ष एकमेकांचा दुश्मन नाही. जे कार्यकर्ते, नेते, मतदार आहेत, त्यांनी हे समजून घ्यावे. भारतीयांमध्ये दुश्मनी असू शकत नाही. टोकाचे मतभेद असू शकतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आजही मनुस्मृती मानते. आमचा लढा मनुस्मृती विरोधात आहे. ते मनुस्मृती सोडून घटनेच्या चौकटीत कार्य करायला तयार असतील, तर आम्ही त्यांच्यासोबत बसायला तयार आहोत. जे बाबासाहेबांनी महाडला केले, ते मोहन भागवतांनी नागपूरला करावे.
मविआ नेत्यांबद्दल बोलतानाही आंबेडकर यांनी सांभाळून बोलावे, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. यावर बोलताना आंबेडकर म्हणाले की, संजय राऊत यांनी दिलेला सल्ला मला उद्धव ठाकरेंनी दिला तर मानेन. आत्ताची युती शिवसेना-बंचित बहुजन आघाडीचीच झाली. उद्धव ठाकरेंचे वंचित आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला कन्वीन्स करतायत. आपण त्यांच्या प्रयत्नाला किती यश येईल हे पाहू. मात्र, आपण एकमेकांशी बोलले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. भाजप भांडणे लावायला कोणत्याही थराला जाईल, असा दावाही त्यांनी केला. ते म्हणाले,
पक्ष जिंकण्यासाठी सगळे प्रयत्न करतात. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. माझ्यापुरते बोलायचे झाले, तर आम्ही ’एमआयएम’बरोबर युती करणार नाही. त्यांना एक खासदार दिल्यानंतर वाटाघाटीमध्ये व्यवस्थित बोलले पाहिजे होते. त्यांचा आग्रह 100 जागांचा होता. हे पॉलिटिकली चूक आहे. मी तेव्हा त्यांना म्हणालो, या, एकत्र लढू. आपली फार मोठी हवा झालीय असे नाही. 35 ते 50 जागा लढू शकतो. सभेला गर्दी किती झाली तरी द्रव्य, यंत्रणा नाही. आम्हाला 100 जागा फुलफिल करणे पॉलिटिकली अशक्य होते.
COMMENTS