बीड / नगर सहयाद्री - माजलगावचे भाजपा नेते मोहन जगताप यांचे पुतणे विश्वजीत जीवन जगताप यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. औरंगाबादहून माजलगावला का...
बीड / नगर सहयाद्री -
माजलगावचे भाजपा नेते मोहन जगताप यांचे पुतणे विश्वजीत जीवन जगताप यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. औरंगाबादहून माजलगावला काम आटोपून परत येत असताना रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान गेवराईजवळ त्यांचा अपघात झाला. या भीषण अपघातात त्यांच्या जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूने जगताप कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
हा भीषण अपघात बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई नजीक झाला आहे. भाजप नेते मोहन जगताप यांचा पुतण्य विश्वजीत जगताप आणि त्याचा मित्र हे काही कामानिमित्त औरंगाबादला गेले होते. काम आटोपून गावी माजलगावकडे येत असताना गेवराईजवळ शुक्रवारी रात्री बाराच्या दरम्यान त्यांच्या चारचाकी वाहनावरील विश्वजीत यांचा ताबा सुटल्याने आयसर (टेम्पो) ला धडक बसली. यात विश्वजित यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात विश्वजीत जगताप यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक मित्र जखमी झाला असल्याची माहिती आहे. या अपघातात विश्वजीत जगताप यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक मित्र जखमी झाला असल्याची माहिती आहे.
COMMENTS