मुबंई / नगर सहयाद्री- ऑल इज वेल म्हणत या सीझनचे दार उघडले आणि एकूण १६ स्पर्धकांमध्ये रस्सी खेच सुरु झाली. टॉप ५ मध्ये आलेल्या या स्पर्धकांनी...
मुबंई / नगर सहयाद्री-
ऑल इज वेल म्हणत या सीझनचे दार उघडले आणि एकूण १६ स्पर्धकांमध्ये रस्सी खेच सुरु झाली. टॉप ५ मध्ये आलेल्या या स्पर्धकांनी आपल्या खेळाला वेगळे वळण देत फिनालेत धडक मारली. १०० दिवसांपूर्वी अर्थात २ ऑक्टोबर रोजी सुरु झालेला हा खेळ कधी अंतिम टप्प्यात आला काही कळलंच नाही. अंतिम टप्प्यात आलेल्या या खेळाला अखेर महाविजेता मिळाला. बिग बॉसच्या चौथ्या सीझनमधील अक्षय केळकरची विजेता म्हणून घोषणा करण्यात आली आहे.
बिग बॉसच्या चौथ्या सीझनचीच सुरुवातच वादाने झाली होती. एकमेकांमध्ये होत असलेल्या वादामुळे बऱ्याच स्पर्धकांनी नॉमिनेट केले होते. पण त्याची चुक नंतर त्याने माहित पडली. यावरुन स्पर्धक आपल्याला फिनालेमध्ये येण्यासाठी कोणती पातळी ओलांडतील याची माहिती आली. या पर्वात फिनालेतील टॉप स्पर्धकांमध्ये अपुर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, अक्षय केळकर, किरण माने आणि राखी सावंत हे स्पर्धक होते.
बिग बॉसच्या खेळात असलेल्या टॉप ५ मधील तीन स्पर्धकांनी घरातील स्पर्धकांचा निरोप घेतला. त्यातील पहिली स्पर्धक म्हणजे राखी. फिनालेच्या एका टास्कदरम्यान राखी सावंतने घराच्या बाहेर निर्णय घेतला, तर अमृताला मिळालेल्या कमी वोट्समुळे तिला घराबाहेर पडावे लागले होते. तिसरा स्पर्धक म्हणजे, सातारचा बच्चन अर्थात किरण माने. किरण माने पहिल्या दिवसापासून नेहमीच प्रचंड चर्चेत राहायचा. चाहत्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे त्याचा प्रवास इथपर्यंत बराच सुखकर झाला होता.अखेर तो क्षण आला ! 'बिग बॉस...' चा महाविजेता ठरला हा ...
COMMENTS