मुंबई / नगर सहयाद्री - बिग बॉस १६ मधून अब्दू रोझिक या ताजिकिस्तानच्या गायकाने विशेष लोकप्रियता मिळवली आहे. बिग बॉसच्या या पर्वाच्या विजेतेपद...
मुंबई / नगर सहयाद्री -
बिग बॉस १६ मधून अब्दू रोझिक या ताजिकिस्तानच्या गायकाने विशेष लोकप्रियता मिळवली आहे. बिग बॉसच्या या पर्वाच्या विजेतेपदाचा दावेदार म्हणूनही अब्दूकडे पाहिले जात होते. मात्र प्रोफेशनल कमिटमेंटमुळे स्वेच्छेने तो या खेळातून बाहेर पडला. अब्दू घराबाहेर पडणे त्याच्या चाहत्यांसाठी धक्कादायक होते. बिग बॉसमधील त्याचा जवळचा मित्र साजिद खान आणि अब्दू एकाच आठवड्यात घराबाहेर पडले होते.
त्यांच्या बिग बॉसबाहेर जाण्याने शिव ठाकरे, एमसी स्टॅन, सुंबुल तौकिर खान आणि एमसी स्टॅन या 'मंडली' टीमलाही खूप वाईट वाटले होते. मात्र घराबाहेर आल्यानंतर अब्दू त्याच्या भारतीय चाहत्यांच्या भेटीगाठी घेत आहे, विविध कार्यक्रमात तो उपस्थिती दर्शवत आहे.
अब्दू रोझिकने त्याच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केलेत. अब्दूने थेट पुण्यात जाऊन हे फोटो शेअर केले. यावेळी अब्दूचा हा पुणेरी अंदाज पाहायला मिळाला आहे. पुण्यात आल्यावर पुणेरी पगडी आणि शाल देऊन अब्दूचे स्वागत करण्यात आले होते. अशा पुणेरी पेहरावात ताजिकिस्तानचा अब्दू फारच गोडस दिसतो आहे. त्याने पुण्याविषयी प्रेम व्यक्त करत आपल्या पोस्टमधून अब्दूने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत 'I Love Pune' प्रेम व्यक्त केले.
COMMENTS