बीड / नगर सहयाद्री - धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या बीडच्या कोळवाडी फाट्यावर हा अपघात झाला आहे. कंटेनर आणि रिक्षाच्या भीषण अप...
बीड / नगर सहयाद्री -
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या बीडच्या कोळवाडी फाट्यावर हा अपघात झाला आहे. कंटेनर आणि रिक्षाच्या भीषण अपघातात प्रवाशी महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन महिलांसह रिक्षाचालक गंभीर जखमी झाले आहेत.
एका वृत्तसंस्था च्या महितीनुसर, या अपघातात 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. मयत महिला भंगार गोळा करून उपजीविका भागवत असत. अन्य दोन महिलांसह मालवाहतूक करणाऱ्या रिक्षामधून बीड शहराकडे जात होत्या. दरम्यान कोळवाडी फाट्याजवळ आले असता रिक्षाला कंटनरने जोरदारची धडक दिली.
अपघात इतका भीषण होता की रिक्षाचे दोन तुकडे झाले. अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्नात असलेल्या कंटेनर चालकाला बीड ग्रामीण पोलिसांनी 40 किलोमीटर पाठलाग करत पकडलं आहे.
या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार झाली, तर अन्य दोन महिलांसह चालक जखमी झाला आहे. दरम्यान धडक देऊन कंटेनर चालकाने कंटेनरसह घटनास्थळावरून पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र बीड ग्रामीण पोलीस वेळीच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कंटेनरचा पाठलाग करुन पाडळसिंगीजवळ चालकाला ताब्यात घेतलं.
COMMENTS