भेंडा । नगर सह्याद्री भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हिएसआय)चा ...
भेंडा । नगर सह्याद्री
भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हिएसआय)चा तृतीय क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळविण्यात कारखान्यातील प्रत्येक घटकाचे योगदान असल्याची प्रतिक्रिया कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी व्यक्त केली.
देशाच्या साखर उद्योगातील शिखर संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हिएसआय) सन 2021-22 गळीत हंगामासाठीचे विविध पुरस्कार जाहीर झाले असून भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याला मध्य महाराष्ट्र विभागातील तृतीय क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार जाहीर झाला आहे.2021-22 गळीत हंगामात 11.38% साखर उतारा, मागील दोन वर्षाच्या तुलनेत साखर उतान्यात 1.11% ने वाढ,गाळप क्षमतेचा 99.734 टक्के वापर, गाळप क्षमतेच्या वापरामध्ये 11.99% ने वाढ,रिड्यूस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन 95.84% या निकषश्र वर हा पुरस्कार जाहिर झाला असून मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
21 जानेवारी रोजी व्हिएसआयचे अध्यक्ष खा.शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री अतुल सावे व इतर मान्यवरांचे उपस्थित हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, जेष्ठ संचालक देसाई देशमुख, डॉ. क्षितिज घुले पाटील, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रविंद्र मोटे, कामगार संचालक सुखदेव फुलारी, संभाजी माळवदे व संचालक मंडळाने पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व उस उत्पादक शेतकरी, अधिकारी, खाते प्रमुख, केमिस्ट-इंजीनिअर, सुपरवायझर, कामगार-कर्मचारी, उस तोडणी व वहातूक कामगार, ठेकेदार यांचे अभिनंदन केले.
मागील 2021-22 हंगामात उत्कृष्ट नियोजन, कामगार, कर्मचारी यांचे योगदान या आधारे प्रतिदिन 7 हजार मे. टन गाळप क्षमतेवर कार्यक्षेत्रातील 16 लाख 60 हजार 540 मे. टन ऊसाचे विक्रमी गाळप पूर्ण केले. कारखान्याचे आतापर्यंत इतिहासात हा गाळपाचा नविन उच्चांक प्रस्थापित केलेला आहे. तसेच अहमदनगर जिल्हयातील सहकारी साखर कारखानदारीत ऊस गाळपात प्रथम क्रमांक मिळविलेला आहे. आणि आज व्हीएसआयचा राज्यातील तिसर्या क्रमाकांचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार जाहिर झाला आहे. यात कारखान्याचे सर्व उस उत्पादक शेतकरी, खातेप्रमुख, विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी, ऊसतोड कामगार, मजुर यांचे मोठे योगदान आहेत.
नरेंद्र घुले पाटील, अध्यक्ष, लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, भेंडा
COMMENTS