नवी दिल्ली वृत्तसंस्था - पंजाब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संतोख सिंग चौधरी यांचे निधन झाले आहे. चौधरी हे शनिवारी भारत जोडो यात्रेत स...
नवी दिल्ली वृत्तसंस्था -
पंजाब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संतोख सिंग चौधरी यांचे निधन झाले आहे. चौधरी हे शनिवारी भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. यात्रेत चालत असताना अचानक ते खाली कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित केले.
चौधरी यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. चौधरी यांच्या निधनानंतर भारत जोडो यात्रा स्थगित केली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते रुग्णालयात पोहोचले आहेत.
संतोख सिंग चौधरी यांच्या निधनाने पंजाबसह देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राहुल गांधीसोबत पदयात्रेत चालत असताना संतोख सिंह यांना ह्रदयविकाचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
COMMENTS