सारसनगर येथील संत भगवान बाबानगर येथे सप्ताहास प्रारंभ अहमदनगर । नगर सह्याद्री संत भगवान बाबा व संत वामनभाऊ यांचे धार्मिक, सामाजिक क्षेत्रात ...
सारसनगर येथील संत भगवान बाबानगर येथे सप्ताहास प्रारंभ
अहमदनगर । नगर सह्याद्री
संत भगवान बाबा व संत वामनभाऊ यांचे धार्मिक, सामाजिक क्षेत्रात मोठे कार्य आहे. समाजाला दिशा देण्याचे काम त्यांनी प्रवचन, किर्तनातून केले. दरवर्षी त्यांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाने नागरिकांना पर्वणी मिळते. विविध किर्तनकाराच्या किर्तनाचा लाभ नागरिकांना मिळत असल्याने त्यांचे मौलीक विचार जीवनाला दिशादर्शक ठरतात. उत्कृष्ट नियोजनामुळे दरवर्षी उत्सवाची व्याप्ती वाढत असून, नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. या सप्ताहासाठी आपण सर्वोतोपरि सहकार्य करु, असे प्रतिपादन नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी केले.
संत भगवानबाबा व संत वामनभाऊ पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित सप्ताहाचे उद्घाटन नगरसेवक भागानगरे, समता परिषद अध्यक्ष दत्ता जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी अमोल महाराज जाधव, हंडे महाराज, प्रभाताई भोंग, रविंद्र महाराज आव्हाड, अरुण ढाकणे, गजानन ससाणे, झुंबर आव्हाड महाराज, ज्ञानेश्वर खेडकर, पांडूरंग डोंगरे, अनिल पालवे, बबनराव घुले, भगवान आव्हाड, मच्छिंद्र दहिफळे, गोलांडे महाराज, बबन बडे, अंकुश जानराव, रामदास बडे, म्हतारदेव घुले, देवराम घुले, गणेश महाराज, उद्धव ढाकणे, भैरु सानप, दादा कर्हाड आदी उपस्थित होते.
प्रारंभी मुर्ती पुजन, ध्वज पुजन, संत पुजन, प्रतिमा पुजन, ग्रंथ पुजन, विणा पुजन, दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. दररोज काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ, हरिकिर्तन असे कार्यक्रम होतात.
COMMENTS