अहमदनगर । नगर सह्याद्री - येथील अहमदनगर कॉलेजने भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांची जयंती आणि कार्यवाह डॉ. विश्वजित कदम यांच्य...
अहमदनगर । नगर सह्याद्री -
येथील अहमदनगर कॉलेजने भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांची जयंती आणि कार्यवाह डॉ. विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेतील पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले आहे.
भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंटतर्फे (आयएमईडी) या स्पर्धेचे आयोजन केले होते. अंतिम लढतीत अहमदनगर कॉलेजने मिरजच्या बापूजी साळुंखे कॉलेजवर 100-66 अशी मात केली. अहमदनगर कॉलेजने पहिल्या सत्रात 32-6 अशी आघाडी मिळवली. दुसर्या सत्रात साळुंखे कॉलेजने थोडा प्रतिकार केला. मात्र, मध्यंतराला अहमदनगर कॉलेजने 60-23 अशी आघाडी मिळवली. उत्तरार्धात साळुंखे कॉलेजने झुंज दिली. मात्र, पूर्वार्धात मिळवलेल्या भक्कम आघाडीच्या जोरावर अहमदनगर कॉलेजने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
अहमदनगर कॉलेजच्या विजयात राजेंद्रसिंह, ऋषी शुक्ल, अंकुर राय आणि सौरभकुमार यांनी मोलाचा वाटा उचलला. साळुंखे कॉलेजकडून आकाश माने, तेजस महाबळ आणि गजेंद्र जामदार यांनी दिलेली लढत अपुरी पडली.
COMMENTS