जांबूत येथील श्रमसंस्कार शिबिराचा समारोप निघोज | नगर सह्याद्री माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी प्रवरा प्रवरा फौंडेशनच्या माध्यमातून...
जांबूत येथील श्रमसंस्कार शिबिराचा समारोप
निघोज | नगर सह्याद्रीमाजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी प्रवरा प्रवरा फौंडेशनच्या माध्यमातून राज्यातील शैक्षणिक कार्यासाठी मोठे योगदान दिले असून आज प्रत्येक विद्यालय असो की महाविद्यालयात श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून सेवाभाव जपला जातो, हीच विखे पाटील यांची शिकवण विकासाभिमूख चळवळीला प्रेरक आहे, असे प्रतिपादन माजी पंचायत समितीचे सदस्य डॉ भास्करराव शिरोळे यांनी केले.
शिरुर तालुयातील जांबुत येथे पारनेर तालुयातील आळकुटी येथील विखे पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत सहा दिवस सुरू असलेल्या श्रमसंस्कार शिबीराचा समारोप रविवारी (दि. ८) झाला. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुनिता गावडे, पंचायत समितीचे माजी सदस्य आण्णा जोरी, सरपंच दत्तात्रय जोरी, माजी सरपंच व ज्येष्ठ नेते बाबासाहेब फिरोदिया, बाळकृष्ण कडू, बाळासाहेब पठारे, जय मल्हार विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीष फिरोदिया, सीताराम म्हस्के, नाथा जोरी, माणिक थोरात, मिलिंद थोरात, भानुदास पळसकर, पप्पूशेठ डुकरे, भगवान गाजरे, सागर जोरी, आनंद शिंदे, बोरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुंजाळ, आळकुटी येथील विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य चाटे, कार्यक्रम अधिकारी प्रा. दशरथ पानमंद, प्रा गोरडे, प्रा. मदन सोनवणे, सुप्रिया पारखे, श्रीमती वाघ आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शिबिराच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन, ग्राम स्वच्छता अभियान, पत्रकार दिनी रक्तदान शिबिर, ग्रामसर्व्हे, सांस्कृतिक कार्यक्रम, गट चर्चा, मतदार राजा जागा हो विषयासह इतर विषयांवर चर्चा करीत ग्रामविकास, शैक्षणिक काम, सामाजिक काम, राजकारणावर चर्चा केली. डॉ. शिरोळे म्हणाले, विखे पाटील महाविद्यालयाच्या माध्यमातून पारनेर व शिरूर तालुयातील गावांना शैक्षणिक कार्यासाठी मदत झाली. शिबिरामुळे विद्यार्थ्यांनी ग्रामीण जिवण जवळून अनुभवले आहे. ग्रामविकास आणी विकासाभिमुख चळवळ कशी असावी याचा अभ्यास केला. सूत्रसंचालन प्रा. गणेश शिंदे यांनी केले. तसेच प्राध्यापक विनायक सोनवणे यांनी आभार मानले.
COMMENTS