नवी दिल्ली / नगर सहयाद्री- अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं अयोध्येतील राम मंदिर कधी उघडणार याची तारीख कालच गृहमंत्री अमित शाह यांनी घोषित केली. अ...
नवी दिल्ली / नगर सहयाद्री-
अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं अयोध्येतील राम मंदिर कधी उघडणार याची तारीख कालच गृहमंत्री अमित शाह यांनी घोषित केली. अन् आज दुसऱ्या दिवशी मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्येतील हे राम मंदिर उडवून देण्याची धमकी अल कायदा या दहशतवादी संघटनेने दिल्याचं वृत्त हाती आलं आहे.
आंतरराष्ट्रीय जिहादी संघटनेने गझवा-ए-हिंद या त्यांच्या नियतकालिकात यासंबंधीची धमकी दिली आहे. या नियतकालिकाच्या ताज्या अंकात अल कायदा ही संघटना अयोध्येतील राम मंदिर तोडून त्या ठिकाणी मस्जिद बांधणार असल्याचं म्हटलं आहे.
विशेष म्हणजे या नियतकालिकातील मजकूर हा एखाद्या भारताशी संबंधित व्यक्तीने लिहिला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोयतसेच जिहादी समूहाच्या एका ऑनलाइन पत्रिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात गरळ ओकण्यात आली आहे.
सदर 110 पानांचे नियतकालिक आहे. ज्या प्रकारे बाबरी मशिदीच्या ढाच्यावर राम मंदिर बांधण्यात येतंय, ते पाडलं जाईल. मूर्तींच्या जागी अल्लाहच्या नावाने बाबरी मशिद बांधली जाईल. या सगळ्यासाठी बलिदान हवंय.
अलकायदाने पुढे म्हटलंय, सर्वच हिंदूंना लाठ्या-काठ्या शिकवल्या जात आहेत. हिंदू महिलांकडून मुस्लिमांचे चेहरे आणि डोकी छाटण्याची भाषा केली जातेय. अल कायदा या सगळ्याला जिहादने उत्तर देणार आहे. यामुळे संपूर्ण भारतीय उपखंड इस्लामी जगाचा भाग बनेल आणि मूर्तीपूजा बंद होईल…
COMMENTS