नाशिक / नगर सहयाद्री- मुंबई- नाशिक महामार्गाजवळील इगतपुरी शहराच्या बायपासजवळ रात्री भीषण अपघात झाला. यात बोरटेंभे येथील तीन युवक जागीच ठार झ...
नाशिक / नगर सहयाद्री-
मुंबई- नाशिक महामार्गाजवळील इगतपुरी शहराच्या बायपासजवळ रात्री भीषण अपघात झाला. यात बोरटेंभे येथील तीन युवक जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
मुंबई- नाशिक महामार्गावरील पंढरपुरवाडी भागात रात्री ९ वाजेच्या सुमारास घाटनदेवी येथुन बोरटेंभेकडे जाणाऱ्या टांग्याला आणि मोटार सायकलला भरघाव वेगाने जात असलेल्य टेम्पोने धडक दिली. या भीषण अपघातात ३ युवकांचा जागीच मृत्यू झाला.
हे सर्व जण बोरटेंभे येथील रहिवासी असुन ह्या घटनेमुळे बोरटेंभे गावात शोककळा पसरली आहे.रात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातामुळे सदर अपघातानंतर आयशरचा चालक फरार झाला.
COMMENTS