औरंगाबाद / नगर सहयाद्री - मध्ये फुलंबी राजुर रोडवर एक अपघाताची एक दुर्देवी घटना घडली आहे. सदर घटनेत वाढदिवसाचा केक घेवून घरी जात असतानाच ...
औरंगाबाद / नगर सहयाद्री -
मध्ये फुलंबी राजुर रोडवर एक अपघाताची एक दुर्देवी घटना घडली आहे. सदर घटनेत वाढदिवसाचा केक घेवून घरी जात असतानाच अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाचा वाढदिवसच्या दिवशीच जीवनाचा अखेरचा दिवस ठरला. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
एका वृत्त संस्थाच्या मिळालेल्या माहितीनुसार, जातेगांव येथील विकास शेजवळ याचा वाढदिवस असल्याने तो आणि त्याचे भाऊजी सुरेश भालेराव हे हे दुचाकी वरुन फुलंब्रीला आले होते. वाढदिवसाचा केक घरी घेऊन जात असताना फुलंब्री राजुर रोडवरील ज्ञानसागर विद्यालयासमोर त्यांच्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या हायवाने जोराची धडक दिली.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या भाऊजी आणि मेव्हुण्याला त्वरीत फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून विकास शेजवळ यास मयत घोषित केले. तर त्याच्यासोबत असलेले त्याचे भाऊजी सुरेश भालेराव यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहे. वाढदिवसाचा केक घरी घेऊन जात असतांनाच हा अपघात घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
COMMENTS